मुंबई

दसऱ्याच्या मुहूर्तावर वॉशिंग सेंटर्संची चलती; दरांमध्येही वाढ

शरद वाघदळे


वाशी  - दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे आपल्या वाहनांच्या धुण्याकडे असंख्य वाहनचालकांचा कल असतो. त्यामुळे सध्या नवी मुंबईतील वॉशिंग सेंटर्स चालकांची चलती असल्याचे दिसत आहे.

लॉकडाऊनमुळे नेहमी पेक्षा जास्त वाहने वॉशिग सेंटरवर येत आहेत. वाहनांची जास्त गर्दी होत असल्यामुळे वॉशिग सेँटरचालक देखील जलदगतीने वाहने धुऊन देतात. फक्त वरुनच पुर्णपणे गाडी साफ करुन देतात. दुचाकी 80 रुपये, तीनचाकी 120  व चारचाकी 200 रुपयांचे शुल्क वाहने धुण्यासाठी आकारले जात आहे.

जास्त प्रमाणात वाहने येत असल्यामुळे गाडी व्यवस्थित धुवायला वेळ कमी पडतो. मात्र शक्य तेवढी वाहने व्यवस्थित धुण्याचा आमचा प्रयत्न असतो. नेहमीपेक्षा दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहने अधिक धुण्यासाठी येत असतात.

प्रविण सोनवणे,
वॉशिग सेंटर चालक

दसरा असल्यामुळे गाडी धुण्यासाठी आलो आहे. मात्र गाडी धुऊन घेण्यासाठी देखील एक ते दीड वाट बघावी लागत आहे. पण या दिवशी नेहमी पेक्षा चांगल्या पध्दतीने साफ करुन देण्यात येत नाही.
सागर कांबळे,
वाहनचालक

service charge hike of washing centers on the occasion of Dussehra

------------------------------------------------ -

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT